अखिल भारतीय मराठा सेवा संघाच्या जिल्हाध्यक्षपदी एस. टी.सावंत

जिल्हा उपाध्यक्षपदी लवू वारंग(कुडाळ), सचिवपदी एस.एल.सपकाळ निवड

कणकवली (प्रतिनिधी): मराठा मंडळ कणकवली येथे अखिल भारतीय मराठा सेवा संघ महाराष्ट्र राज्य मुंबई, जिल्हा शाखा सिंधुदुर्ग यांची सभा २ एप्रिल २०२३ रोजी जिल्हा अध्यक्ष एस.टी. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेमध्ये बहुमताने नवीन जिल्हा कार्यकरणीची निवड करण्यात आली. जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश गवस दोडामार्ग, जिल्हा सहसचिव लक्ष्मण पावसकर सावंतवाडी, जिल्हा कोषाध्यक्ष राजू कदम देवगड, जिल्हा संघटक सूर्यकांत वारंग कणकवली, जिल्हा सहसंघटक अनुप वारंग कणकवली, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भगवान लोके कणकवली, मालवण, कणकवली, देवगड, वैभववाडी विभागीय अध्यक्ष- राजू रावराणे, सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ले, दोडामार्ग विभागीय अध्यक्ष- उदय भोसले, मालवण, कणकवली, देवगड, वैभववाडी विभागीय उपाध्यक्ष- विनायक परब, सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ले, दोडामार्ग विभागीय उपाध्यक्ष- एम. डी. सावंत, सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ले, दोडामार्ग विभागीय सचिव मेघेंद्र देसाई, मालवण, कणकवली, देवगड, वैभववाडी विभागीय सचिव- शेखर रावराणे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य- वैभववाडी- शांताराम रावराणे, देवगड चंद्रहास मर्गज, कणकवली- आर. जी. सावंत, देवगड-शिरगाव- श्री. श्रीपत तावडे, मालवण-किर्लोस श्री. निळकंठ वारंग, कणकवली- श्री. अविनाश राणे यांची अखिल भारतीय मराठा सेवा संघ सिंधुदुर्ग जिल्ह्याची कार्यकारीणी निवडण्यात आली. या सभेला बहुसंख्य मराठा बांधव उपस्थित होते. सदर सभेमध्ये ठरल्याप्रमाणे आठही तालुक्यामध्ये तालुका कार्यकारिणी निवडण्यात येणार आहे. तालुका स्तरावर काम करण्यासाठी उत्सुक असलेल्या मराठा बांधवांनी अखिल भारतीय मराठा सेवा संघ सिंधुदुर्ग या पदाधिकाऱ्याशी संपर्क साधण्याचे आवाहन नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष एस. टी. सावंत, सुरेश गवस,लवू वारंग, एस. एल.सपकाळ, राजू कदम, लक्ष्मण पावसकर यांनी केले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!