वैभववाडी (प्रतिनिधी) : आई शिंगुदेवी युवा मंडळ कोकिसरे बांधवाडी आणि सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान वैभववाडी, राजेश मो. पडवळ जनसेवा चॅरिटेबल ट्रस्ट वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरात २६ रक्तदात्यांनी रक्तदान करीत आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. या शिबीराचे उदघाटन पोलिस निरीक्षक मनोज सोनवलकर यांच्या हस्ते करण्यात आले. मंडळाचे वतीने गणपती उत्सावानिमित्त गेली तीन वर्षे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येथे. यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांनी मंडळाच्या या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच मंडळाच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
यावेळी सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान वैभववाडीचे अध्यक्ष राजेश पडवळ, रुपेश वारंग, शामसुंदर टक्के, जेष्ठ नागरिक राजाराम गडकर तसेच आई शिंशुदेवी युवा मंडळाचे अध्यक्ष प्रवीण पाळये सचिव सुरज धुमक, खजिनदार विक्रम परबते, प्रदीप परबते, नागेश आमस्कर, सुर्यकांत करंबळे, संतोष भिसे, अक्षय परबते, अमोल घवाळे, गणेश धुमक, दिपक भिसे, अनिल भिसे, दशरथ भिसे, सचिन आमस्कर, दिलीप भिसे, प्रकाश परबते, दिनेश भिसे, रत्नाकर फुटक, गणेश फुटक महेंद्र परबते या सर्वांच्या सहकार्याने व एस एस पी एम पेडवे ब्लड बँक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.












