पालकमंत्री नितेश राणेंनी घेतले विनायक शेठ पारकर यांच्या घरी गणेशदर्शन

देवगड (प्रतिनिधी) : पालकमंत्री नितेश राणे यांनी तळेबाजार येथील समाजसेवक विनायक शेठ पारकर यांच्या वरेरी गाव येथील घरी जात गणेशदर्शन घेतले. मागील 14 वर्षे सातत्याने नितेश राणे आपल्या कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन गणपती बाप्पांचे दर्शन घेतात. ही परंपरा राज्याचे मंत्री आणि सिंधुदुर्ग चे पालकमंत्री झाल्यानंतरही अत्यंत व्यस्त शेड्युल मध्येही मंत्री राणे यांनी जपली आहे. यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, जिल्हा चिटणीस संतोष किंजवडेकर आणि जि. प. गटप्रमुख ओंकार खाजनवाडकर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!