शिवसेना उपनेते संजय आग्रे यांचा वाढदिवस विविध सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांतून होणार साजरा

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : शिवसेना उपनेते संजय वसंत आग्रे यांचा वाढदिवस आज दिनांक ४ सप्टेंबर, २०२५ रोजी उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने जिल्हाभरात विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून समाजहिताला चालना देणारे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

दिवसभर होणारे प्रमुख कार्यक्रम :
कुडाळ – सार्वजनिक गणपती “सिंधुदुर्ग राजा” येथे दशावतारी नाटक; मालवण – फातिमा चर्च आश्रम येथे अत्यावश्यक वस्तूंचे वाटप; मालवण – दत्तमंदिर येथे अभिषेक; देवगड – कुणकेश्वर मंदिर येथे अभिषेक; देवगड (फणसे पडवणे) – विमलेश्वर मंदिर येथे अभिषेक; वैभववाडी (नाथवडे) – महादेव मंदिर येथे अभिषेक; कणकवली (असलदे) – वृद्धाश्रमात अन्नदान; घोणसरी – गणेशमंदिर येथे अभिषेक; फोंडाघाट – गांगो मंदिर येथे अभिषेक; फोंडाघाट – न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट संस्थेला मुलांच्या प्रशिक्षणासाठी रायफल भेट; कणकवली – भालचंद्र महाराज मठ येथे अभिषेक; खारेपाटण – रवळनाथ मंदिर येथे अभिषेक.

दरम्यान, फोंडा येथील संजय आग्रे फार्म हाऊस येथे सायंकाळी ४.०० वाजल्यापासून मान्यवर व नागरिकांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारल्या जाणार आहेत.

error: Content is protected !!