सर्वांना विश्वासार्ह आणि समाधानकारक काम करण्याची ग्वाही !
फोंडाघाट (प्रतिनिधी) : नुकत्याच पार पडलेल्या हरकुळ ग्रामपंचायत सभेमध्ये ग्राम तंटामुक्ती समिती अध्यक्ष पदी अनुभवी व अजातशत्रू ग्रामस्थ, समीर सावंत यांची एकमुखाने बिनविरोध निवड करण्यात आली. कट्टर शिवसैनिक, स्पष्टवक्ता आणि सर्वांमध्ये मिसळून सर्व कामांमध्ये सहभागी होण्याच्या स्वभावामुळे या पदाला सर्वांनी त्यांना योग्य समजून निवड केली . श्रीशृंगेश्वर मंदिर देवस्थानचे प्रमुख म्हणून त्यांचा लोकसंग्रह मोठा आहे. निवडीनंतर पक्षभेद न करता, सर्वांना एकत्र घेऊन योग्य आणि समाधानकारक काम करण्याची ग्वाही सावंत यांनी दिली. यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्यांसह समीर प्रेमींनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.पंचक्रोशीतही समीर सावंत यांचे अभिनंदन होत आहे.












