संदेश पारकर यांचा इशारा; बँकांच्या खाजगीकरणाविरोधी करण्यात आले निदर्शन
कणकवली (प्रतिनिधी) : केंद्राने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खासगीकरण होऊ घातले आहे. मात्र आम्ही खासगीकरण होऊ देणार नाही. बँक कर्मचान्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहू आणि खासगीकरणाविरोधात रस्त्यावर उतरू अशी ग्वाही शिक्सेना नेते संदेश पारकर यांनी दिली. महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज असोसिएशन तर्फे कणकवली पटवर्धन चौक येथे बँकांच्या खासगीकरणाविरोधात निदर्शन करण्यात आली. यावेळी बोलताना श्री. पारकर म्हणाले की, सार्वजनिक बँकांचे खाजगीकरण होऊ नये अशा प्रकारची भूमिका सर्व एम्प्लॉईज फेडरेशनने घेतली आहे. काही महिन्यापूर्वी अशा प्रकारचं आम्ही आंदोलन केलेलं होत. त्या आंदोलनाच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभे होतं. पुन्हा एकदा ही वेळ सर्वांवर येऊन ठेपलेली आहे. सार्वजनिक क्षेत्रामध्ये ज्या बँक आहेत त्या बँकांमध्ये लोकांची विश्वासार्हता आहे. आणि त्या बँकांकडे सर्वसामान्यांच्या बँक आहेत अशा उद्देशाने पाहिलं जातं. सार्वजनिक बँकांमध्ये अनेक लोकांच्या ठेवी बचत सेविंग बँकांमध्ये आहेत. आणि त्या सुरक्षित राहिल्या पाहिजे जर या बँकांचे खाजगीकरण केलं तर या सर्व लोकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे.













