विसर्जन मिरवणुकमध्ये पहिला मानाच्या तुकाराम माळी तालीम मंडळाच्या उद्घाटनाने विसर्जन मिरवणूकीस सुरवात

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी तुकाराम माळी तालीम मंडळाच्या मिरवणुकीचा उद्घाटन सोहळा खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्या शुभहस्ते, पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, विजय देवणे यांच्या उपस्थितीत झाला. कोल्हापूरच्या अनंत चतुर्दशी सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकमध्ये पहिला मान असलेल्या तुकाराम माळी तालीम मंडळाच्या मिरवणुकीने कोल्हापूरच्या सार्वजनिक मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरवात झाली.

यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलीस अधिक्षक योगेशकुमार गुप्ता, महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक के. मंजुलक्ष्मी, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांच्यासह सचिन चव्हाण, राजू लाटकर, विजयराव देवणे, वसंतराव मुळीक, ऍड. धनंजय पठाडे तसेच माजी नगरसेवक विनायक फाळके, राजू साबळे, श्रीकांत माने, संदिप सरनाईक, दिपक थोरात, अनेक गणेशभक्त उपस्थित होते.

error: Content is protected !!