“अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम | कृष्णs राधेकृष्णss” च्या कृष्णनामात फोंडाघाट बाजारपेठ गजबजणार

श्री देव राधाकृष्ण मंदिर मध्ये ११९ व्या वर्षी अखंड हरिनाम सप्ताहानिमित ११ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर अखेर विविध कार्यक्रमाचे आयोजन

फोंडाघाट (प्रतिनिधी) : गणेश चतुर्थीच्या विसर्जनानंतर, दरवर्षीप्रमाणे श्रीराधाकृष्ण मंदिर वैश्य समाज आणि बालगोपाळ मंडळाच्या संयुक्त आयोजनातून तारीख ११ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर अखेर धार्मिक, सांस्कृतिक, समाज प्रबोधन, कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गणपती विसर्जनानंतर सर्वांचेच लक्ष या अखंड हरिनाम सप्ताहाकडे आणि उपक्रमाकडे लागलेले असते. चालू ११९ व्या वर्षी देखील, गुरुवार तारीख ११ सप्टेंबर रोजी, सकाळी पूजाअर्चा झाल्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत, टाळ मृदंगाच्या आणि राधाकृष्णाच्या – “श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी | हे नाथ नारायण वासुदेवss” या अभंगाने घटस्थापना होणार आहे. या संपूर्ण सोहळ्याची नोंद, स्थानिक ग्रामस्थ ,कार्यकर्ते, चाकरमानी, तसेच परगावच्या माहेरवाशींनी घेऊन, सर्व कार्यक्रमांना सहकुटुंब अगत्य उपस्थित रहावे. आपली सेवा रुजू करावी असे आवाहन समिती कडून करण्यात येत आहे.

गणपती विसर्जनानंतर सर्वांचेच लक्ष या अखंड हरिनाम सप्ताहाकडे आणि उपक्रमांकडे लागलेले असते. चालू ११९ व्या वर्षी देखील, गुरुवार तारीख ११ सप्टेंबर रोजी सकाळी पूजाअर्चा झाल्यानंतर ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत, टाळ मृदंगाच्या आणि राधाकृष्णाच्या “श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी | हे नाथ नारायण वासुदेवss” च्या अभंगामध्ये घटस्थापना होणार आहे. या सप्ताहाच्या निमित्ताने दिनक्रम – पूजाअर्चा, फोंडाघाट जीवन विद्या मिशन कडून उपासना यज्ञ व स्फूर्ती गीत गायन, वारकरी/राणेमास्तर ग्रुपचा हरिपाठ, कलावती आई मंडळाची भजने व प्रार्थना, स्थानिक भजने यासह नामस्मरण, सुश्राव्य कथा-कीर्तन इत्यादी कार्यक्रम होणार आहेत.

तर या सात दिवसात नामांकित बुवांची डबलबारी, रेकॉर्ड डान्स, फनी गेम्स, महिलांसाठी हळदीकुंकू, फुगड्या नृत्य आणि वैशिष्ट्यपूर्ण रंगीत संगीत दिंड्या अशा उपक्रमांची रेलचेल असणार आहे. यानिमित्ताने एसटी स्टँड वर लक्षवेधी स्वागत कमान आणि संपूर्ण मंदिराला मनमोहक विद्युत रोषणाई तसेच संपूर्ण बाजारपेठ लक्षणीय रोषणाईने झगमगणार आहे. चैतन्याच्या या सोहळ्याला वाहतूक व्यवस्था, व्यापारी संघ, ग्राहक, भावीक यांनी तसेच स्थानिक संस्था, ग्रामपंचायत व शासनाने सतर्क राहून, सोहळा यशस्वी करण्यास सहकार्य करावे असे आवाहन संयोजक समिती कडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!