कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गावर मुंबईहून गोव्याकडे जाणारा अठरा चाकी ट्रेलर पुलावरून भरधाव वेगाने येत असताना तोल जाऊन कणकवली जवळील तीव्र वळणावर पलटी झाला. या अपघातात ट्रेलर चालक गंभीर जखमी झाला असून त्याला १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने तातडीने उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच कणकवली पोलिस ठाण्याचे निरीक्षक तेजस नलावडे, पोलिस हवालदार मिठबावकर, वाहतूक पोलिस हवालदार विनोद चव्हाण, दिलीप पाटील, पोलिस उपनिरीक्षक महेश शेडगे तसेच महामार्ग वाहतूक सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक प्रकाश गवस, हेड कॉन्स्टेबल एकनाथ सरमळकर, चालक पोलिस हवालदार निलेश सोनवणे, पोलिस नाईक निलेश शेट्ये, कॉन्स्टेबल रवी हिंदळे, पोलिस कॉन्स्टेबल सागर परब यांनी घटनास्थळी धाव घेतली.
हा अपघात सोमवारी पहाटे सुमारे २:३० वाजण्याच्या सुमारास झाला. अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर पलटी झालेला ट्रेलर क्रेनच्या साहाय्याने हटवण्यात आला.












