पालकमंत्र्यांच्या हस्ते लोरे नं. 1 ग्रामपंचायतला महा आवास अभियान पुरस्कार प्रदान

लोरे नं. 1 ग्रामपंचायतीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

कणकवली (प्रतिनिधी) : पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते महा आवास अभियान ग्रामीण सन २०२३-२४ अंतर्गत केंद्र पुरस्कृत आवास योजनेमध्ये जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या लोरे नं. १ ग्रामपंचायतीस पुरस्काराचे वितरण करण्यात आले. पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या हस्ते सरपंच अजय रावराणे, ग्रामपंचायत अधिकारी गोवळकर, उपसरपंच रसिका रावराणे यांनी पुरस्कार स्वीकारला.

11 सप्टेंबर रोजी इच्छापूर्ती मंगल कार्यालय ओरस, सिंधुदुर्ग येथे झालेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान जिल्हास्तरीय कार्यशाळेमध्ये महा आवास अभियान ग्रामीण सन २०२३-२४ अंतर्गत केंद्र पुरस्कृत आवास योजनेमध्ये जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या लोरे नं. १ ग्रामपंचायतीस पुरस्काराचे वितरण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. लोरे नं. 1 ग्रामपंचायतीचे सरपंच अजय रावराणे यांना सन्मान चिन्ह व सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

error: Content is protected !!