असलदे ट्रस्टच्या अध्यक्ष पदी सचिन लोके यांची निवड

आचरा (प्रतिनिधी) : श्री स्वामी समर्थ महाराज सामाजिक सेवा ट्रस्ट असलदे-कणकवलीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून संस्थापक अध्यक्ष म्हणून सचिन लोके यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणी सदस्यांनी श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड येथील मठात जावून श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद घेतला. हडपिड मठाचे सचिव व अक्कलकोट भूषण नंदकुमार पेडणेकर यांनी स्वामी समर्थ प्रतिमा भेट देऊन सर्वांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी संस्थेचे सचिन लोके (संस्थापक अध्यक्ष), प्रशांत साटम (संस्थापक सचिव), ज्योती जाधव (संस्थापक खजिनदार), प्रकाश जोंईल, प्रकाश पावसकर, मधुसूदन भडसाळे, तात्या निकम आदी विश्वस्त उपस्थित होते. श्री स्वामी समर्थ महाराज सामाजिक सेवा ट्रस्ट असलदे या नुतन संस्थेचे संस्थापक विश्वस्त यांनी माहिती देताना सांगितले, या संस्थेतील सर्व पदाधिकारी संस्था स्थापन होण्या आधीच काही वर्षे सामाजिक क्षेत्रात उत्तम सेवा कार्य करत होते. पण या क्षेत्रात काम करत असताना काही वेळ बंधने येत होती. म्हणून सर्व सभासदानी एक मतानी श्री स्वामी समर्थ महाराज सामाजिक सेवा ट्रस्टची स्थापना केली असून प्रथम कार्यक्रम हाती घेत अनाथाश्रम, वृध्दाश्रम स्थापन करण्याचा मानस असल्याचे सांगितले आहे.

error: Content is protected !!