कणकवली (प्रतिनिधी) : श्री स्वामी समर्थ महाराज सामाजिक सेवा ट्रस्ट असलदे कणकवली या ट्रस्टच्या संस्थापक व विश्वस्त यांनी अक्कलकोट येथे जावून वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांची भेट घेत आशीर्वाद घेतले. समाधी मठतील चोळप्पा महाराजांचे पाचवे वंशज वेदशास्त्रसंपन्न श्री अन्नु महाराज यांची सुद्धा भेट घेत आशीर्वाद घेतले. त्यावेळी कोकण कट्टाचे संस्थापक अजित पीतळे हजर होते. श्री स्वामी समर्थ महाराज सामाजिक सेवा ट्रस्ट असलदे कणकवली या ट्रस्टीच्या पुढील वाटचालीस यावेळी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
श्री क्षेत्र अक्कलकोटच्या पुण्यभूमीत असलदे ट्रस्ट विश्वस्तांचा सन्मान












