पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते विजेत्यांचा सत्कार
कणकवली (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत लोरे नं.1 सलग ५ वर्ष ग्रामपंचायत लोरे आयोजित माझी वसुंधरा अंतर्गत पर्यावरण पूरक गणेशोत्सव स्पर्धा स्वच्छ घर सुंदर परिसर स्पर्धा आयोजित केली जाते तसेच यावर्षी देखील या स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ आज रोजी १७ नोव्हेंबर २०२५ रोजी पार पाडला सदर बक्षीस वितरण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत हस्ते करण्यात आला .
यामुळे आदर्श गाव कसे असावे याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे लोरे गाव असे शब्दसुमनांनी कौतुक केले.असा आदर्श सर्वांनी घ्यावा असे सर्वांना संबोधले. स्पर्धेमध्ये गावातील लोकांनी खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला होता. पर्यावरण पूरक गणेशोत्सव स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक जयदास तुकाराम तांबे रक्कम रुपये 5000/-, चषक, प्रमाणपत्र ,द्वितीय क्रमांक श्री. विष्णू वासुदेव खाडये रक्कम रुपये 3000/- चषक,प्रमाणपत्र तृतीय क्रमांक मिलिंद पुंडलिक रावराणे रक्कम रुपये 2000/- चषक, प्रमाणपत्र तसेच स्वच्छ घर सुंदर परिसर यामध्ये प्रभाग क्रमांक १ मध्ये प्रथम क्रमांक-प्रकाश केशव मसुरकर द्वितीय क्रमांक महेश भार्गव गुरव ,तृतीय क्रमांक सुरेश आत्माराम एकावडे
प्रभाग क्रमांक २ मध्ये
प्रथम क्रमांक ईश्वर कुमार कदम,
द्वितीय क्रमांक सखाराम पांडुरंग रावराणे ,तृतीय क्रमांक भरत शांताराम परब
प्रभाग क्रमांक तीन मध्ये
प्रथम क्रमांक संजय नाना रावराणे
द्वितीय क्रमांक नामदेव सदाशिव भुवड, तृतीय क्रमांक हरिश्चंद्र बाळाराम धुमक या सर्वांना अनुक्रमे रक्कम रुपये 3,000, 2,000 1,000प्रमाणपत्र, चषक देऊन गौरवण्यात आले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर,उपमुख्य कार्यकारी अधिकारी परब, प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तुळशीदास रावराणे, माजी सभापती मनोज रावराणे, संतोष कानडे, दिलीप तळेकर, सरपंच अजय रावराणे व लोरे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .












