इनामदार श्री भगवती संस्थान कोटकामते येथे नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी

देवगड (प्रतिनिधी) : तालुक्यातील प्रसिद्ध इनामदार श्री भगवती संस्थान कोटकामते येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. सोमवार दिनांक २२ सप्टेंबर २०२५ पासून गुरुवार दिनांक २ ऑक्टोबर २०२५ पर्यंत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या कालावधीत कीर्तन, भजने, गायकांचा विशेष कार्यक्रम तसेच पारंपरिक विधी मोठ्या भक्तिभावाने पार पडणार आहेत. कीर्तन मालिकेत अशोक हिंगलवेकर, स्नेहलदिप सावंत, किरण पारकर, गोविंद आडाळेकर, अमित सावंत आदी नामवंत कीर्तनकार सहभागी होणार आहेत. भजन कार्यक्रमात संदीप लोके, महेश पांचाळ, राजू मोहिते, संतोष शिरसाट यांसारख्या कलाकारांचा सहभाग असेल. गायकांच्या विशेष कार्यक्रमांत मनोज मॅस्ट्रो, पं. मुकुंद क्षेत्रसागर, पं. अजीत गोसावी यांचे सूरमयी गायन रसिकांना लाभणार आहे.

धार्मिक विधींमध्ये २२ सप्टेंबरला घटस्थापना, २६ सप्टेंबरला ललिता पंचमी, ३० सप्टेंबरला श्री दुर्गाष्टमी तसेच १ ऑक्टोबरला होमहवन आणि महाप्रसादाचे आयोजन आहे. दरम्यान २ ऑक्टोबरला चारही शिवारातील ढोल-ताशा पथकांचा लढवय्या कार्यक्रम रंगणार आहे.

दररोज सकाळ-संध्याकाळ आरत्या, महापूजा, महाप्रसाद यांचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले असून भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक मंडळाने केले आहे.

error: Content is protected !!