वागदे घरफोडी | आरोपीला दोन दिवस पोलीस कोठडी

कणकवली (प्रतिनिधी) : वागदे येथील घरफोडी च्या गुन्ह्यात संशयित आरोपी शंकर नवलाप्पा पवार ( वय 65 ) याला दोन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. वागदे गावातील प्रदीप शांताराम भोगले यांचे घर फोडून 1 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता. या गुन्ह्यात एलसीबीने संशयित आरोपी शंकर पवार याला ताब्यात घेऊन कणकवली पोलिसांच्या हवाली केले होते. या गुन्ह्यात आरोपी शंकर पवार याला अटक करून तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पन्हाळे यांनी आज कणकवली न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

error: Content is protected !!