कारचालकावर गुन्हा दाखल
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील पटवर्धन चौकात दुचाकीला मागून धडक देऊन अपघात करणाऱ्या कारचालक राजमल भेरा मेघवाल (राहणार राजस्थान ) याच्या वर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपघात 19 सप्टेंबर रोजी रात्री 10 वाजून 50 मिनिटांनी घडला होता. मुंबईहून गोव्याच्या दिशेने जात असलेल्या कारची दुचाकी ला मागून धडक बसली. या अपघातात दुचाकी वरील तिघांना दुखापत झाली. याप्रकरणी जखमी विजय विष्णू घाडीगावकर 36 राहणारा हरकुळ बुद्रुक देऊळवाडी यांच्या फिर्यादीवरून कारचालक राजमल भेरा मेघवाल (राहणार राजस्थान ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही अपघात शुक्रवारी रात्री 10:50 वाजण्याच्या सुमारास कणकवली पटवर्धन चौक येथे झाला.
विजय घाडीगावकर हे गर्भवती पत्नी वीणा व मुलगा विहांश याच्यासोबत एचडीएफसी बँकच्या एटीएम मध्ये पैसे भरण्यासाठी कणकवली येथे आले होते. एटीएम मध्ये पैसे भरून ते परत घरी जात असताना गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या कारची त्यांच्या दुचाकी ला मागून धडक बसली. या धडके विना घाडीगावकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तसेच मुलगा विहांश याला मुका मार तर विजय यांच्या पाठीला व पायाला किरकोळ दुखापत झाली. अपघातानंतर कार चालकाने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र येथील नागरिकांनी त्याचा पाठलाग करून पकडले. त्यावेळी नागरिकांनी कारचालकाला चांगला चोप दिला. तसेच त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यावेळी कार चालकाने आपले नाव राजमल मेघवाल असे सांगितले. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री चिकणे करत आहेत.












