अर्जुन रावराणे विद्यालयाचे संदेश तुळसणकर गुरुसेवा सन्मान पुरस्काराने सन्मानित

दिपकभाई केसरकर मित्रमंडळाच्या वतीने त्यांच्या कार्याची घेण्यात आली दखल

वैभववाडी (प्रतिनिधी) : जिल्ह्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थी व शिक्षकांच्या कामाची नोंद घेत त्यांना न्याय देण्याच्या उद्देशाने दरवर्षी माजी मंत्री, आमदार दिपकभाई केसरकर मित्रमंडळाच्या वतीने आदर्श शिक्षक गुरुसेवा सन्मान पुरस्कार देऊन जिल्ह्यातील शिक्षकांना गौरविण्यात येते. यंदा सन २०२५ मध्ये वैभववाडी येथील अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूलचे क्रीडा शिक्षक तसेच एन.सी.सी ऑफिसर संदेश तुळसणकर यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेत त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. शनिवार दि. २० सप्टेंबर २०२५ रोजी सावंतवाडी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत आमदार दिपकभाई केसरकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन संदेश तुळसणकर यांना गौरविण्यात आले.

याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, ऍड. निता सावंत-कविटकर, तालुकाप्रमुख दिनेश गावडे, नारायण उर्फ बबन राणे, गटशिक्षणाधिकारी संविता परब, सचिन वालावलकर, प्रेमानंद देसाई, अनारोजीन लोबो, भारती मोरे, बाबु कुडतरकर, वासुदेव होडावडेकर, अर्चित पोकळे, भरत गावडे, विकास गोवेकर, म. ल. देसाई, निखिल सावंत, विठ्ठल कदम आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!