कणकवली (प्रतिनिधी) : खासगी बसमधून प्रवास करत असताना अचानक प्रकृती बिघडल्याने मेलरॉय जॉन डिसोझा (५८, पणजी-गोवा) यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.
मेलरॉय हे पणजीहून मुंबईकडे प्रवास करत होते. बस कणकवलीजवळ आल्यावर त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले व ते बेशुद्ध पडले. तात्काळ बसचे पिकअप मॅन शाहरुख पटेल यांनी त्यांना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात नेले. मात्र, तेथे पोहोचताच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच त्यांची बहीण रविवारी सकाळी कणकवली येथे दाखल झाली. दरम्यान, या घटनेची नोंद कणकवली पोलीस ठाण्यात सुरू आहे.












