भजन कला प्रेमी मंचतर्फे २६ ते २९ सप्टेंबरला कवठीत भजन स्पर्धा

कुडाळ (प्रतिनिधी) : तालुक्यात कवठी येथील भजन कला प्रेमी मंच यांच्या वतीने श्री सातेरी मंदिर, कवठी येथे नवरात्रोत्सवानिमित्त तिसरी जिल्हास्तरीय भजन स्पर्धा दिनांक २६ ते २९ सप्टेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या भजन स्पर्धेसाठी प्रथम पारितोषक ७००१ व चषक, द्वितीय ५००१ व चषक, तृतीय ३००१ व चषक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच उत्तेजनार्थ दोन संघाची निवड करून प्रत्येकी २००१ व प्रमाण पत्र देण्यात येणार आहेत. तसेच उत्कृष्ठ वादक, झांज वादक व उत्कृष्ठ कोरस या सोबत इतर वैयक्तीक बक्षीस व प्रमाणपत्र देवून गौरवण्यात येणार आहे.

स्पर्धेचा निकाल ३० सप्टेंबरला सायंकाळी ७ वाजता जाहीर केला जाणार आहे. तरी या स्पर्धेसाठी इच्छुक मंडळानी आपल्या संघाचे नाव २५ सप्टेंबरपर्यंत दत्तप्रसाद खडपकर (9420241160) यांच्याकडे नोंदवावे, असे आवाहन भजन काल प्रेमी मंच, कवठी यांच्यावतीने कारण्यात आले आहे.

error: Content is protected !!