बागवे, सोळांकूरकर, सोनार यांचे मार्गदर्शन
मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या संयुक्त विद्यमाने स्वामीराज प्रकाशन या संस्थेने २५ ऑक्टोबर २०२५ रोजी एक दिवसीय “कविता लेखन कार्यशाळा” आयोजित केली आहे. सकाळी ११ ते ५ या वेळेत प्रबोधन प्रयोगघर, कुर्ला येथे ही कार्यशाळा संपन्न होईल. प्रा. अशोक बागवे (कविता : आशय आणि अभिव्यक्ती), सतीश सोळांकुरकर (कविता : मुक्तशैली)आणि दुर्गेश सोनार (कविता : छंदोबद्ध) हे या कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यशाळेत सर्वांना मुक्त प्रवेश आहे. मात्र पूर्व नोंदणी करणे आवश्यक आहे. https://forms.gle/yvGT16XLDwEmQgKQ6 यावर गूगल नोंदणी अर्ज उपलब्ध आहे. नोंदणीची अंतिम तारीख
२० ऑक्टोबर, २०२५ असून नवकवीनी या कार्यशाळेत बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन, स्वामीराज प्रकाशनचे प्रमुख रजनीश राणे यांनी केले आहे.












