ओरोस (प्रतिनिधी) : मिनिस्ट्री ऑफ युथ अफेयर्स अँड स्पोर्ट्स, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडिया आयोजित सातारा येथे झालेल्या अस्मिता खेलो इंडिया वुमन्स लीग स्पर्धेमध्ये सिंधुदुर्गातील खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेमध्ये बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल कणकवलीच्या क्रीडा शिक्षिका चित्राक्षा मुळये यांनी रौप्य पदक प्राप्त केले. डॉन बॉस्को इंग्लिश मीडियम स्कूल ओरोस मधील विद्यार्थिनी रश्मी रासम हिने कांस्यपदक प्राप्त केले. चित्राक्षा मुळये व रश्मी रासम या जिजामाता स्पोर्ट्स क्लब, ओरोसचे खेळाडू आहेत.
या स्पर्धेमध्ये बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल कणकवली मधील वेदा खोत, मान्यता मालविया व डॉन बॉस्को स्कूल ओरोसची धनश्री बांबर्डेकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. यशस्वी खेळाडूंना सिंधुदुर्ग जिल्हा किक बॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष लेफ्टनंट विवेक राणे यांचे प्रशिक्षण व मार्गदर्शन लाभले. यशस्वी खेळाडूंचे शिवाजी नाट्यमंदिर दादरचे अध्यक्ष ब्रिगे. सुधीर सावंत यांनी अभिनंदन केले आहे.











