घोटगे येथे आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या पुढाकारातून तिसरा वनराई बंधारा

मोहोळ शेळ्या धबधब्याच्या पायथ्याशी श्रमदानातून जलसंधारणाचा उपक्रम

कुडाळ (प्रतिनिधी) : संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आणि पावसाचे पाणी अडवून जमिनीत जिरविण्याच्या उद्देशाने आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्यावतीने कुडाळ तालुक्यातील घोटगे येथील मोहोळ शेळ्या धबधब्याच्या पायथ्याशी वनराई कच्चा बंधारा बांधण्यात आला. या उपक्रमातून जलसंधारणाचा संदेश देत पाणी बचतीसाठी पुढाकार घेतला.

या उपक्रमावेळी आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक उमेश वायंगणकर, ॲड. राखी मालवणकर, नंदकिशोर आरोलकर, कर सल्लागार शंकर धुरी, मनोज राणे , राजश्री अंधारी , मयुरी चव्हाण, मोहन काणेकर, सुप्रिया काणेकर, ग्रामपंचायत सदस्य पंढरीनाथ गुरव, ग्रामसेवक भाऊ गणेश भोगले, संतोष गुरव, राजू गुरव, देविदास गुरव, सार्थक गुरव, समीक्षा गुरव, ज्योती गुरव, हेतल गुरव, महेश लाड, तनिष गुरव, स्मूथ गुरव, सर्वेश गुरव , रमेश काळसेकर यांच्यासह घोटगे गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून आर्ट ऑफ लिव्हिंग परिवारातर्फे हा घोटगे गावात श्रमदानातून बंधारा उभारण्यात आला. त्यासाठी पंढरीनाथ गुरव यांचे मोलाचे सहकार्य लाभले. आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे आत्तापर्यंत 3 ठिकाणी वनराई बंधारे बांधण्यात आले आहेत, असे प्रशिक्षक उमेश वायंगणकर यांनी सांगितले.

error: Content is protected !!