विद्यार्थ्यांनी संदीप चौकेकर यांच्या दातृत्वाचा आदर्श घ्यावा -संजय आग्रे

शालेय स्तरावर आणि विविध स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा संदीप चौकेकर मित्र मंडळाकडून गुणगौरव

कणकवली (प्रतिनिधी) : “आजच्या स्पर्धेच्या युगात शिक्षण हीच प्रगतीची खरी गुरुकिल्ली आहे. विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासातच नाही, तर कला आणि क्रीडा क्षेत्रातही आपले नाव उज्ज्वल करा. प्राण जीवन सहयोग संस्थेचे अध्यक्ष तथा समाजसेवक संदीप चौकेकर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबवित असलेले शैक्षणिक उपक्रम स्तुत्य आणि कौतुकास्पद असून विद्यार्थ्यांनी त्यांच्या दातृत्वाचा आदर्श घ्यावा.असे प्रतिपादन शिवसेना उपनेते संजय आग्रे यांनी केले.

शिरवल खासकीलवाडी येथे नवरात्रोत्सव आयोजित कार्यक्रमात शालेय स्तरावर आणि विविध स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा संदीप चौकेकर मित्र मंडळाच्या वतीने गुणगौरव करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात संजय आग्रे बोलत होते.

यावेळी व्याससपीठावर शिवसेना कणकवली विधानसभा प्रमुख संदेश पटेल, प्राण जीवन सहयोग संस्थेचे अध्यक्ष आणि संदीप चौकेकर मित्र मंडळाचे अध्यक्ष संदीप चौकेकर, मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक तथा सामाजिक कार्यकर्ते श्रीकृष्ण यादव, तुळशीदास कुडतरकर, ग्रामपंचायत सदस्य सुचित गुरव, राजेश शिरवलकर, मंगेश तांबे, विजय चौकेकर, दत्ताराम पेडूरकर, वसंत पेडूरकर आदी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना शिवसेना उपनेते संजय आग्रे म्हणाले की, ग्रामीण भागातील मुलांच्या पंखांना बळ देण्यासाठी संदीप चौकेकर मित्र मंडळ राबवित असलेले शैक्षणिक उपक्रम स्तुत्य आणि प्रेरणादायी आहेत.

यावेळी संदेश पटेल म्हणाले की,धार्मिक परंपरेसोबतच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या आणि त्यांना योग्य दिशा दाखवणाऱ्या या उपक्रमांचे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कौतुक होत आहे.

समाजातील वंचित आणि गरजू घटकांना मदतीचा हात देण्याची संदीप चौकेकर यांची ही वृत्ती संपूर्ण जिल्ह्यासाठी आदर्शवत आहे.

यावेळी शिवसेना उपनेते संजय आग्रे, शिवसेना कणकवली विधानसभा प्रमुख संदेश पटेल, प्राण जीवन सहयोग संस्थेचे अध्यक्ष संदीप चौकेकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह आणि शैक्षणिक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. आपल्या मुलांचा झालेला हा गौरव पाहून पालकांनीही संदीप चौकेकर मित्र मंडळाचे मनापासून आभार मानले.

यावेळी शिवसेना उपनेते संजय आग्रे, शिवसेना कणकवली विधानसभा प्रमुख संदेश पटेल
यांनी दुर्गा मातेचे दर्शन घेतले.यांवेळी संदीप चौकेकर मित्र मंडळाच्या वतीने अध्यक्ष संदीप चौकेकर यांनी त्यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

यावेळी शिरवल खासकीलवाडी परिसरातील ग्रामस्थ, महिला पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!