नगराध्यक्ष संदेश पारकर यांची जयभवानी गोंधळी समाज नवरात्रोत्सवाला सहपरिवार दिली सदिच्छा भेट

मऱ्याप्पा इंगळे व शिवाजी भिसे यांच्या हस्ते नगराध्यक्ष संदेश पारकर यांचा सत्कार

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी आपल्या कुटुंबीयांसह जयभवानी गोंधळी समाज संघ, आयोजित नवरात्रोत्सव कणकवली येथे सदिच्छा भेट दिली. यावेळी समाज संघाच्या वतीने तालुकाध्यक्ष मऱ्याप्पा इंगळे आणि उपाध्यक्ष शिवाजी भिसे यांच्या हस्ते नगराध्यक्ष संदेश पारकर यांचा सत्कार करण्यात आला.

या भेटीदरम्यान समाजातील विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नगराध्यक्ष संदेश पारकर यांचे स्वागत केले. यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये युवासेना जिल्हाप्रमुख विजय इंगळे, सौरभ पारकर, शिवाजी वाघमारे, दीपक वाघमारे, दत्तू इंगळे, नागेश सूर्यवंशी, कृष्णा इंगळे आणि विजयकुमार इंगळे यांचा समावेश होता.

या सदिच्छा भेटीमुळे समाज बांधव आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील स्नेहपूर्ण संबंध अधिक दृढ झाले. यावेळी उपस्थितांनी परस्पर संवाद साधत सामाजिक सलोखा आणि एकोपा जपण्यावर भर दिला.

error: Content is protected !!