दारिस्ते गावात सामूहिक घराच्या वादातून हाणामारी

परस्परविरोधी गुन्हा दाखल

कणकवली (प्रतिनिधी) : दारिस्ते येथे सामूहिक घराच्या वादातून झालेल्या हाणामारीविरोधात परस्परविरोधी गुन्हा कणकवली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. दारिस्ते गावातील गावकर कुटुंबातील सहा जणांवर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सानिका संजय गावकर (40, दारिस्ते गावकरवाडी) यांच्या फिर्यादीवर संदीप मधुकर गावकर, शिवदास मधुकर गावकर, अंकिता संदीप गावकर (तिघेही राहणार दारिस्ते) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अंकिता संदीप गावकर यांच्या फिर्यादीवरून सानिका संजय गावकर, संजय वसंत गावकर, सुलोचना वसंत गावकर (तिघेही राहणार दारिस्ते) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी रात्री घडली.

सानिका गावकर यांनी म्हटले आहे की, दारिस्ते येथे आमचे सामूहिक घर असून त्यामध्ये चुलत सासू, दीर, जाऊ आदी असे माणसे राहतो. बुधवारी रात्री दहा वाजता सानिका या अंकिता गावकर यांच्या वाट्याला आलेल्या पडवीमध्ये झोपल्या होत्या. अंकिता यांना त्याचा राग आल्याने त्याने सानिका यांच्या अंथरुणात पाणी मारून त्यांना उठवले तसेच शिवीगाळ करत मारहाण केली. त्यावेळी संदीप व शिवदास हे तेथे आले त्यांनी सानिका हिला मारहाण केली. तसेच लोखंडी रॉड डोक्यावर मारून दुखापत केली. त्यावेळी सानिका हिचा पती संजय व सुलोचना येथे आले असता त्यांनाही मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली असे म्हटले आहे. त्यावरून अंकिता गावकर, शिवदास गावकर, संदीप गावकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंकिता संदीप गावकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सानिका आमच्या वाट्याला असलेल्या रूममध्ये झोपली होती. तिला तू येथे का झोपलीस अशी विचारणा केली असता सानिका हिला राग आल्याने तिने अंकिता हिला मारहाण करत शिवीगाळ केली. तसेच सुलोचना गावकर यांनी अंकिता हिला लाकडी काठीने मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली, असे म्हटले आहे. त्यावरून सानिका गावकर, सुलोचना गावकर व संजय गावकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास हवालदार सुनील वेंगुर्लेकर करत आहेत.

error: Content is protected !!