फोंडाघाट (प्रतिनिधी) : आज सोशल मीडिया आणि मोबाईलच्या जमान्यात वाचन चळवळ खूप मागे पडली आहे. अशावेळी जिल्हा परिषद प्राथ. शाळा नवीन कुर्ली येथील शिक्षिका मीनाक्षी वरवडेकर यांनी प्राध्यापक मधु दंडवते ग्रंथालय व वाचनालय फोंडाघाटला पुस्तकरुपी देणगी दिली. त्यांनी दिलेली पुस्तके वाचनालयाचे केदार रेवडेकर आणि संजय नेरुरकर यांचेकडे सुपूर्त केली. वाचनालयातर्फे वरवडेकर यांचे आभार मानण्यात आले. यावेळी वरवडेकर यांनी ग्रंथालयाकडून वाचन चळवळ हाती घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
फोंडाघाटच्या प्राध्यापक मधु दंडवते ग्रंथालयाला पुस्तकरुपी देणगी












