खारेपाटण ज्युनियर कॉलेज येथे दुर्गा गौरव सन्मान सोहळा २०२५ संपन्न

बचत गटाच्या सुमारे ६० महिलांनी केले यशस्वीरित्या प्लबिंग प्रशिक्षण पूर्ण

खारेपाटण (प्रतिनिधी) : पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, खारेपाटण व ज्ञानदा गुरुकुल पुणे आणि रोटरी क्लब ऑफ खारेपाटण यांच्या संयुक्त विद्यमाने खारेपाटण पंचक्रोशीतील बचत गटातील महिलांसाठी प्लंबिंग टेक्निशियन कोर्सच्या विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन खारेपाटण ज्युनियर कॉलेज करण्यात आले होते. यामध्ये बचत गटांमधील सुमारे ६० महिलांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन प्लंबिंग टेक्निशियन प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले. या प्रशिक्षणार्थी महिलांच्या सन्मानार्थ ‘दुर्गा गौरव सन्मान सोहळा – २०२५’ चे खारेपाटण येथे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.

प्लंबिंग टेक्निशियन प्रशिक्षण क्षेत्रामध्ये पहिल्यांदाच महिलांना प्रशिक्षण देण्याचे काम पुणे येथील ज्ञानदा गुरुकुल संस्था व खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या माध्यमातून करण्यात आले होते. या सर्व प्रशिक्षित महिलांना प्लंबिंग टेक्निशन कोर्स प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी व त्यांचा विशेष सत्कार करण्याच्या उद्देशाने ‘दुर्गा गौरव – २०२५’ या सन्मान सोहळ्याचे आयोजन खारेपाटण हायस्कूलमधील चंद्रकांत पारीसा रायबागकर सभागृहात आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमासाठी कणकवली नायब तहसीलदार दिपाली पंडित, ज्ञानदा इन्स्टिट्यूट ऑफ फ्लो पायपिंग टेक्नॉलॉजी पुणे या संस्थेचे अध्यक्ष अभय मठ, ज्ञानदा गुरुकुल पुणे या संस्थेचे संचालक मिलिंद डांगे, युवा उद्योजक व समाजसेवक रुपेश सावंत, सोमनाथ कुलकर्णी व अमित नाईक (मोबिलायझेशन ऑफिसर, ज्ञानदा गुरुकुल पुणे), योगिता ढाणे (शाखा व्यवस्थापक, स्टेट बँक ऑफ इंडिया, खारेपाटण), खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष भाऊ राणे, सचिव महेश कोळसुलकर, विश्वस्त विजय देसाई, रोटरी क्लब ऑफ खारेपाटणचे अध्यक्ष दयानंद कोकाटे, खारेपाटण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज प्राचार्य संजय सानप, पर्यवेक्षक संतोष राऊत, सर्व शिक्षक वर्ग व पंचक्रोशीतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

यावेळी उपस्थित महिलांनी खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण संस्था व ज्ञानदा गुरुकुल पुणे यांच्या विशेष उपक्रमाबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. याच कार्यक्रमाच्या निमित्ताने रोटरी क्लब ऑफ खारेपाटणच्या माध्यमातून तीनही बचत गटांना प्लंबिंग किटचे वाटप मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी रोटरी क्लब ऑफ खारेपाटणचे अध्यक्ष रोटेरियन दयानंद कोकाटे, सेक्रेटरी रोटेरियन अजय गुरसाळे, खजिनदार रोटेरियन सारिका महिंद्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी पंचक्रोशीतील महिलांना प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. वरुणकर व आभार शर्मिन काझी यांनी मानले.

error: Content is protected !!