देवी विर्सजनवेळी भाविकांचे डोळे पाणावले
फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट नवीन कुर्ली येथे भवानी मैदानावर नवदुर्गा युवा मंडळ (रजि.) आयोजित सार्वजनिक नवरात्रौत्सव देवी दुर्गामातेची प्रतिष्ठापना करुन सलग २३ व्या वर्षी शारदीय नवरात्ररंभ घटस्थापना ते विजयादशमी दसरा या कालावधीत विविध सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक उपक्रमाने कार्यक्रम साजरा करुन शुक्रवारी नवदुर्गाचे विसर्जन ढोल ताशाच्या पथकांचा गगनभेदी आवाज, पारंपारिक फुगडी नृत्य, तसेच गरबा आणि दांडियाच्या तालावर थिरकणारी पाऊले, फटाक्याची आतषबाजीने विसर्जन मिरवणुक नवीन कुर्ली- फोंडाघाट बाजार पेठ- मारुतीवाडी अशा मिरवणुकीने दुर्गामातेचे उगवाई नदीत विसर्जन करण्यात आले.
नवदुर्गा युवा मंडळ (रजि.) या मंडळाकडुन गेली २३ वर्षे नवीन कुर्ली येथे सार्वजनिक नवरात्रौत्सवाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात येतो. या कार्यक्रमात विविध सांस्कृतिक कार्यक्रम त्यामध्ये मुलां- मुलींकरीता वेशभुषा स्पर्धा, रेकॉर्ड डान्स, विविध फनी गेम, महिलांकरीता हळदीकुंकू, फुगडी नृत्य, गरबा नृत्य तसेच भजन, हरिपाठ यासारखे धार्मिक कार्यक्रम व रक्तदान शिबीर यासारखे सामाजिक उपक्रम राबवले होते.
विजयादशमी – दस-यानंतर या देवीचे विर्सजन करण्यात आले. पावसाने ओढ दिल्याने सर्वांमध्ये उत्साह दिसत होता.भक्तीमय व आनंदाच्या वातावरणात विर्सजन मिरवणुक सोहळ्यात नवदुर्गा युवा मंडळाचे सर्व पदाधिकारी, तसेच नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाचे पदाधिकारी, गावातील बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. या विसर्जन मिरवणुकीमध्ये दुर्गामातेच्या मुर्तीची सजावट, पुरुषांचे पांढरा सदरा व महिलांची मोरपंखी साडी ड्रेसकोड लक्ष वेधुन घेत होता.विसर्जन सोहळ्यास भाविकांची उपस्थिती लक्षणीय होती. उशीरापर्यत चाललेल्या मिरवणुकीनंतर रात्री फोंडाघाट मारुती मंदिर नजीक उगवाई नदीवर आरती /गाऱ्हाणे होऊन दुर्गामातेचे विसर्जन करण्यात आले. यावेळी सर्व भाविकांचे डोळे पाणावले होते…











