अर्जुन रावराणे विद्यालय व कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयात सायबर क्राईम विषयक मार्गदर्शन
वैभववाडी (प्रतिनिधी) : आजच्या घडीला प्रसारमाध्यमांचा वाढता वापर लक्षात घेता. त्यापासून होणारी फसवणूक टाळण्यासाठी सर्वांनी जागरूक असणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमधील सोशल मीडियाचा वाढता वापर लक्षात घेऊन आज वैभवलाडी येथे अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल आणि कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालय वैभववाडी येथे पोलिस ठाण्याच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.पोलिस निरीक्षक आरिफ मुल्ला मॅडम यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना यावेळी मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की आज समाजाचा सोशल मेडीयावर वापर वाढत चालला आहे फेसबुक इंस्टाग्राम वर मुले आपले अकाऊंट तयार करून आपले फोटो रिल्स तयार करत आहे तसेच अनोळखी व्यक्तींशी मैत्री करत आहेत यातून मुलाची फसणूक होत आहे सायबर क्राईम वाढला आहे . सायबर गुन्हेगार मुलांशी मैत्री करून त्यांचे नको त्या अवस्थेतील फोटो पाठवून त्यांची फसवणूक करतात त्यांच्याकडून नंतर पैशाची मागणी मागणी करतात त्यामुळे मुले डिप्रेशन मध्ये जाऊन नंतर आत्महत्या करतात . सोशल मेडीयाचा आपण काळजीपूर्वक वापर करायला हवा जर अशी घटना घडली तर डिप्रेशन मध्ये न जाता न घाबरता आपण याची माहिती आपल्या घरच्यांना पोलीसांना द्यायला हवी . विद्यार्थ्यांनी अमली पदार्थांपासून दुर रहायला हवे तसेच मुलींना पोस्को अंतर्गत येणाऱ्या कायद्याची माहिती असायला हवी ,महिला अत्याच्यारा विरुद्ध असणाऱ्या कायद्याची माहिती असायला हवी , गुड टच बॅड टच मुलींनी ओळखायला शिकले पाहीजे असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक बी.एस. नादकर सर यांनी पोलिस निरीक्षक आरिफ मुल्ला मॅडम व त्यांचे सहकारी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख आर.बी.जाधव यांनी केले. यावेळी म.पो.हवालदार प्रीती शिंगारे,म.पो.नाईक प्रमिला शिंगाडे, म.पो.हवालदार मधुरा चव्हाण आदी पोलीस कर्मचारी तसेच विद्यालयाचे शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.










