कोळपे बौध्दवाडी येथील अविवाहीत तरुणाची आत्महत्या

वैभववाडी (प्रतिनिधी) : कोळपे बौध्दवाडी येथील अविवाहित तरुणाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी ४ वाजता शेजाऱ्यांच्या निदर्शनास आली.रुपेश गौतम जाधव वय ४० असे या तरुणाचे नाव आहे. मात्र त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.    

मयत रुपेश जाधव याचे वडील मयत असून आई मुंबईला असते. सध्या तो कोळपे बौध्दवाडी येथे घरात एकटाच राहात होता. सकाळपासून तो कुठे दिसला नाही. त्यामुळे शेजारच्या लोकांनी त्याच्या घरी जाऊन पाहिले असता, घरात हॉलमध्ये लाकडी बारला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. याबाबत वैभववाडी पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय वैभववाडी येथे आणण्यात आला आहे. त्याची आई मुंबईवरून आल्यानंतर त्यांच्यावर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.त्यांच्या पश्चात आई व दोन विवाहित बहिणी आहेत.

error: Content is protected !!