एकूण ९७ लाभार्थ्यांनी घेतला लाभ
खारेपाटण (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील फणसगाव या गावी जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग व प्राथमिक आरोग्य केंद्र फणसगाव आणि ग्रामपंचायत कार्यालय फणसगाव यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीर ग्रामपंचायत कार्यालय पोंभुर्ले येथे सरपंच प्रियांका धावडे यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाले. या मोफत नेत्र तपासणी शिबिराला उपसरपंच सादीक डोंगरकर, नेत्र चिकित्सक डॉ. केळकर व त्यांचे सहकारी डॉ. मारुती सावंत उपस्थित होते. गावच्या सरपंच प्रियांका धावडे यांनी डॉ. केळकर यांचे शाल पुष्पगुच्छ व उपसरपंच सादीक डोंगरकर यांनी डॉ. मारुती सावंत यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यावेळी डॉ. केळकर यांनी उपस्थित लाभार्थींना नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया तपासणी याचं महत्त्व पटवून सांगितले.
यावेळी उपसरपंच सादीक डोंगरकर यांनी मोतीबिंदू शस्त्रक्रिया लाभार्थ्यांना शस्त्रक्रियेसाठी घेऊन जायची व घरी आणून सोडायची जबाबदारी ग्रामपंचायत पोंभुर्ले यांनी घेतली असून नागरिकांची आरोग्याची काळजी घेणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो. तरी जास्तीत जास्त ग्रामस्थानी या मोफत तपासणी शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी नागरिकांना केले. शुक्रवार दि. ४ ऑक्टोंबर २०२५ रोजी दु. १ ते सायं. ५.०० या वेळेत संपन्न झालेल्या या शिबिरात पोंभुर्ले गावातील सुमारे ९७ लाभार्थ्यांनी मोफत नेत्र तपासणीचा लाभ घेतला.
यावेळी पोंभुर्ले उप केंद्राच्या डॉ. अश्विनी काडगे व आरोग्य सेवक संतोष जुवाटकर, आरोग्य सेविका सहाय्यक करुणा कांबळे आदी उपस्थित होते. शेवटी ग्रामपंचायत सदस्य उदय बावकर यांनी उपस्थित मान्यवरांचे व गावातील ग्रामस्थांचे आभार मानले.










