मनोज रावराणेंच्या हस्ते लोरे नं. १ येथे आपले सरकार सेवा केंद्राचे उदघाटन

फोंडाघाट (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत लोरे नं. १ येथे आपले सरकार सेवा केंद्र या जनतेसाठी उपयुक्त अशा केंद्राचे उद्घाटन माजी पं. स. सभापती मनोज तुळशीदास रावराणे यांच्या हस्ते ६ ऑक्टोबर रोजी करण्यात आले. या केंद्राच्या माध्यमातून ग्रामस्थांना शासनाच्या विविध सेवांचा लाभ एकाच ठिकाणी मिळणार आहेत. तसेच ग्रामस्थांचा वेळ खर्च व त्रास वाचून शासनाच्या सेवा थेट त्यांच्या दारी उपलब्ध करून देणे हे या केंद्राचे मुख्य ध्येय आहे. यावेळी सरपंच अजय रावराणे, नरेश गुरव, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व कर्मचारी आधी उपस्थित होते.

खालील प्रमाणे सुविधा ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध आहेत.
१)उत्पन्न दाखला
२)वय अधिवास दाखला व राष्ट्रीयत्व दाखला
३)जातीचा दाखला
४)नॉन क्रिमिलियर दाखला
५)रेशन कार्ड नाव कमी व रेशन कार्ड नाव दाखल तसेच सर्व प्रकारचे सरकारी दाखले, लाईट बिल भरणा, ऑनलाइन 7/12 व 8 अ‌ उतारा, नवीन पॅनकार्ड, पॅनकार्ड अपडेट सर्व प्रकारचे ऑनलाइन कामे इत्यादी सुविधा उपलब्ध झाली आहे.

error: Content is protected !!