आचरा (प्रतिनिधी) : पळसंब शाळा न. 1 च्या शिक्षिका अपूर्वा अमित पवार यांची शासनाच्या नियमानुसार बदली निरोम येथे झाल्यानंतर त्यांचा कृतज्ञता सोहळा 8 ऑक्टोबर 2025 रोजी पळसंब शाळा न. 1 येथे मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.
त्यावेळी व्यासपिठावर केंद्रप्रमुख देऊ जंगले, शाळा अध्यक्ष रविकात सावंत, मुख्याध्यापक विनोद कदम, सत्कार मुर्ती अपूर्वी पवार, पळसंब प्रभारी सरपंच अविराज परब, शाळा सुशोभिकरण अध्यक्ष प्रमोद सावंत, सरपंच चंद्रकांत गोलतकर, शिक्षण प्रेमी अमरेश पुजारे, संतोष परब, रामकृष्ण पुजारे, शिक्षिका नेहा गवाणकर,पल्लवी सोनगडे, माता, पालक ग्रामस्थ, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.साै.पवार यांचा शाळेच्या वतीने शाल श्रीफळ देऊन व श्री.जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रिडा मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला. त्यानंतर उपस्थित मान्यवर यांनी मनोगत व्यक्त केले. व सौ पवार यांना पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या, तसेच नवनियुक्त शिक्षिका नेहा गवाणकर यांचे स्वागत करण्यात आले.
पळसंब शाळेत विद्यादानाचे काम करताना कधीच सहा वर्षे निघून गेली ती या माझ्या पळसंब गावाने कळू पण दिली नाहीत. शाळेत विद्यादान करत असताना शाळेतील मुलांना संगीत, गायन, कला क्रिडा व मैदानी खेळात घडवताना मुलाचे व पळसंब गावाचे नाव जिल्हास्तरावर सदैव फडकवत ठेवण्याचा आपण प्रयत्न केला. मागील सहा वर्षात पळसंब शाळेचा हॉल पळसंब गावाने हसताना पाहिला तोच हॉल आज भावनीक झालेला पाहिला. पळसंब शाळेतील माजी विद्यार्थी भविष्यात माझे योगदान कधीही विसरणार नाहीत.
कोरोना काळात सुपूर्ण जग घरी बसलेला असताना आपण पळसंब शाळेतील विद्यार्थ्यांना श्री. चिदरकर यांच्या घराच्या स्लॅब वरीती शिक्षणाचे धडे चालूच ठेवले व पळसंब गावाचा आदर्श जिल्हासमोर घालून दिला. त्या स्तृत्य उपकमाची दखल शासनाला पण द्यावी लागली व शाळेबाहेरील शाळा हा उपक्रम चालू झाला. पळसंब गावातील मुलांच्या जडण घडणीसाठी माझी बुद्धिमता केव्हाही द्यायला सदैव तुमच्या सोबत आहे असे भावनिक आवाहन सौ. पवार यांनी केले.










