खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण जिल्हा परिषद मतदारसंघ ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव झाला असून जिल्हा परिषद निवडणूक लढविण्यासाठी भाजपाकडून कीर्ती संकेत शेट्ये ह्याही इच्छुक आहेत. कीर्ती शेट्ये ह्या कट्टर नीतेश राणे समर्थक सामाजिक कार्यकर्ते संकेत शेट्ये यांच्या सुविद्य पत्नी आहेत. झुंझार मित्रमंडळाच्या कीर्ती संकेत शेट्ये ह्या सक्रिय कार्यकर्त्या असून खारेपाटण भागातील सामाजिक , सांस्कृतिक कार्यात त्यांचा नेहमीच सक्रिय सहभाग असतो. कीर्ती शेट्ये यांचे पती संकेत शेट्ये हे नेहमीच खारेपाटण विभागातील सामाजिक सांस्कृतिक क्रीडा आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत असतात. झुंझार मित्रमंडळाच्याद्वारे त्यांनी विभागातील जनतेशी आपला चांगला संपर्क ठेवला आहे. त्याचाही फायदा जिल्हा परिषद निवडणुकीत होईल.सुविद्य आणि सुसंस्कृत असलेल्या कीर्ती शेट्ये यांनीही आपल्या उमेदवारीची दावेदारी केल्यामुळे खारेपाटण जिल्हा परिषद मतदारसंघात चुरस वाढली आहे.
खारेपाटण मधून भाजपाकडून कीर्ती शेट्ये इच्छुक












