कारवाई करण्याची माईण सरपंचाची पोलिसांकडे मागणी
कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील भरणी गावचे सरपंच अनिल यशवंत बागवे हे माईण गावामधील शालेय मुलांना माईण ते कुवळे हायस्कूल नेणे व आणणे दर दिवशी स्वतःच्या गाडीने प्रवास करतात. या प्रवासामध्ये ते फार वेगाने गाडी चालवत असतात. माईण गावचा रस्ता हा वळणावळणाचा व अरुंद असल्याकारणाने आपल्या गाडीचा वेग कमी करावा तसेच कोणत्याही प्रकारची जीवित हानी होऊ नये यासाठी वारंवार सूचना देऊनही अद्याप आपल्या गाडीचा वेग कमी केलेला नाही. तसेच सूचना दिली असता कोणता ही अपघात झाल्यास त्याची भरपाई मी स्वतः करून देईन असे उत्तर देऊन गावामध्ये वैयक्तिक कामासाठीही ये-जा करत असतात. तरी अशा परिस्थितीत आज गावामध्ये हि त्यांच्या निष्काळजीपणामुळे अपघात झालेला आहे. तरी या सर्व गोष्टीची आपण नोंद करून घ्यावी. व आपल्या स्तरावरून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी माईन सरपंच यांनी कणकवली पोलिसांकडे केली आहे.












