सामाजिक कार्यकर्ते रुपेश सावंत यांचा भूषण शेलार याना पाठिंबा
खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचायत समिती मतदारसंघ खुल्या प्रवर्गासाठी राखीव झाला असून या मतदारसंघातून विद्यमान ग्रामपंचायत सदस्य भूषण बाळा शेलार अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. भूषण शेलार यांना खारेपाटण गावचे सामाजिक कार्यकर्ते रुपेश सावंत यांचा पाठिंबा असून खारेपाटण पंचायत समिती मतदारसंघातील प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यासाठी आपण निवडणूक रिंगणात उतरणार आहे.
खारेपाटण पंचायत समिती मतदारसंघात काही गावात अद्यापही वाडी जोडणारे रस्ते नसून ग्रामस्थांची रस्त्याअभावी गैरसोय होत आहे. मूलभूत प्रश्न जैसे थे आहेत. ग्रामपंचायत सदस्य म्हणून ग्रामस्थांच्या समस्यांना वाचा फोडताना मी जनहिताच्या कामाला प्राधान्य दिले आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून व्यापक प्रमाणात जनहिताची कामे करण्यासाठी मी निवडणूक लढविणार असल्याचे शेलार यांचे म्हणणे आहे. सामाजिक कार्यकर्ते रुपेश सावंत यांचे पाठबळ असल्यामुळे भूषण शेलार यांना मोठा फायदा होईल. भूषण यांच्या उमेदवारीच्या दावेदारी मुळे खारेपाटण पंचायत समिती मतदारसंघात चुरस निर्माण झाली आहे.












