सहभागी प्रत्येक नरकासुर मित्रमंडळाला प्रत्येकी रोख ५०० रुपये व सन्मानचिन्ह
कणकवली (प्रतिनिधी) : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सुदर्शन मित्रमंडळ कणकवली तर्फे खुल्या नरकासुर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १९ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता डी. पी. रोड, तेली आळी, कणकवली येथे होणार आहे.
या स्पर्धेत प्रथम पारितोषिक ₹१३,०१३ रुपये व चषक, द्वितीय पारितोषिक ₹९,००९ रुपये व चषक, तर तृतीय पारितोषिक ₹५,००५ रुपये व चषक असे ठेवण्यात आले आहे. तसेच ४ विभागीय प्रस्तुत्यांसाठी प्रत्येकी ₹१,५१५ रुपये व चषक असे उत्तेजनार्थ पारितोषिक देखील देण्यात येणार आहे.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक नरकासुर मित्रमंडळाला रोख ५०० रुपये सहभाग सन्मानचिन्हासह देण्यात येणार असल्याने युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी सोनू भंडारी (मिथिलेश) – ९४२०४३०७५०, गौरव हर्णे – ८८५५८०५९४१ किंवा बाळा डिचोलकर (महेश) – ७३८७३६२२०२ या संपर्क क्रमांकावर संपर्क साधता येईल. दिवाळीच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या या पारंपरिक स्पर्धेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.












