फोंडाघाटच्या बालोपासना ग्रुप कडून पणत्या, फुले आणि मनमोहक रांगोळ्यांनी दीपोत्सव साजरा !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : सर्वत्र दीपोत्सवाच्या महाउत्सवाची धूम असताना, फोंडाघाट सारख्या विकसनशील गावात सुद्धा, उत्साहाला बहर आला आहे. बाजारपेठेतील श्री देव राधाकृष्ण मंदिरात, अध्यात्मिक अधिष्ठान प्राप्त बालोपासना ग्रुपने, मंदिरामध्ये पहाटेच्या वेळी पणत्या आणि फुलांची आरास करून केलेली रांगोळी सर्वांचेच आकर्षण ठरली.तर सकाळी काढलेल्या मनमोहक रंगीबेरंगी रांगोळीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. यामध्ये बालोपासना ग्रुपच्या कादंबरी तायशेटे, सौम्या रेवडेकर, तीर्था रेवडेकर, प्राप्ती कोरगावकर, आराध्य वडके,रुद्र रेवडेकर, अस्मि वळंजु यांनी सहभाग घेतला. त्यांच्या कलाकारीचे पेठेमध्ये कौतुक होत आहे.

error: Content is protected !!