कणकवली मारुती मंदिर येथून मोटरसायकल चोरीस

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली पंचायत समिती मधील बांधकाम विभागातील कर्मचारी विद्याधर पवार यांनी कणकवली आचरा रोडवर मारुतीमंदिर नजीक डॉ बिले यांच्या दवाखान्यासमोर उभी केलेली होंडा कंपनी ची शाईन मोटरसायकल क्रमांक (MH – 07 AK 9820 ) ही अज्ञात चोराने चोरून नेली आहे. चोरीची घटना 21 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता घडली. विद्याधर पवार यांनी आपल्या ताब्यातील सदर मोटरसायकल 21 ऑक्टोबर रोजी डॉ अरुणा बिले यांच्या दवाखान्यासमोर उभी करून समोरील दुकानात खरेदीसाठी गेले होते. खरेदी करून पुन्हा आले असता त्यांना उभी केलेली मोटरसायकल आढळून आली नाही. आजूबाजूला शोध घेऊनही मोटरसायकल सापडून आली नसल्यामुळे पवार यांनी 22 ऑक्टोबर रोजी कणकवली पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात मोटरसायकल चोरीची फिर्याद दिली आहे. अधिक तपास हवालदार गुणिजन करत आहेत. काळ्या रंगाची होंडा शाईन मोटरसायकल असून त्याच्या हेडलाईट वरील भागात पांढऱ्या व नारंगी रेडियम ने श्री स्वामी समर्थ लिहिलेले आहे. सदर मोटरसायकल आढळून आल्यास कणकवली पोलीस ठाणे दूरध्वनी क्रमांक 02367 – 232033 अथवा विद्याधर पवार मोबा. 9422159443 यांच्याशी संपर्क साधावा.

error: Content is protected !!