आभाळमाया ग्रुप आयोजित सुंदर श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

चौके (प्रतिनिधी) : मालवण कट्टा येथे लक्ष्मीपूजनानिमित्त घेण्यात आलेल्या सुंदर श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत २५ जणांनी सहभाग नोंदवला. पहिल्या आलेल्या पाच स्पर्धकांना समान रक्कमेचे बक्षीस आणि आभाळमाया ग्रुपचे सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना सन्मानचिन्ह आणि वस्तूस्वरूप बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.

ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा राभवली गेली ते आभाळमाया ग्रुपचे संस्थापक राकेश डगरे यांनी ही स्पर्धा नसून लहान मुलांचा आत्मविश्वास वाढावा तसेच त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी केलेला एक छोटासा प्रयत्न होता. लोकांनी नरकासुर आणि रावण यांचे उदात्तीकरण करण्यापेक्षा आपल्या मुलांना आपले देवदेवता काय होते हे दाखवून द्यावेत हा एक मनोदय होता आणि त्यास कट्टा पंचक्रोशीतून उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला त्याबद्दल सर्व सहभागी स्पर्धकांचे तसेच पालकांचे खूप खूप आभार असे मनोगत व्यक्त केले.

या स्पर्धेत कु. लौकिक सागर साळगावकर, कु.प्रांजल तुषार सकपाळ, कु.स्वर्ण गणेश गाड, शिवाजी शशिकांत शिरोडकर, कु.अनिस दादा रावले,कु.ललित धोंडी लुडबे, प्रकाश शिवराम गावडे, कु.निहाल लक्ष्मण हडकर, कु.श्रिया अंकुश चिंदरकर, कु.समर्थ धनंजय रावले, कु.सिया समीर रावले, कु.चिराग विक्रम चव्हाण, कु.वेदांत विनायक फोपळे, कु.अंश रत्नकांत काळसेकर, कु.भूमी संतोष सावंत, कु.चैतन्य संतोष सावंत, कु.तस्मय जगन चव्हाण, कु.देवसेना अमोल मुळीक, कु.ऋषीम नारायण गावडे, कु.समर्थ गणेश मोरजकर,कु.हार्दिक प्रदीप मीठबावकर, कु.स्वागत प्रदीप मीठबावकर,कु.वेदा संजय आगलावे, कु.रूपक बाळकृष्ण आगलावे, कु.सौम्या प्रवीण मिठबावकर यांनी सहभाग घेतला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तेजस म्हाडगुत, अक्षय गावडे, गणेश गाड, तुषार सकपाळ, मंदार मठकर, विनय मठकर, अमित चव्हाण, सुनील पोखरणकर, भैय्या मुसळे, नाना म्हाडगुत, प्रणित चव्हाण, शिवा शिरोडकर, देवदास ढोलम, संदीप सरमळकर, सुनील शिरोडकर, नेवाळकर बंधू आणि कट्टा बाजारपेठ मित्रमंडळाचे सहकार्य लाभले.

error: Content is protected !!