पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर समाज भवन उद्घाटनप्रसंगी भाजपा वैभववाडी आयोजित निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी निमित्त वैभववाडी भाजपाच्या वतीने आयोजित केली होती निबंध स्पर्धा

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते मंदार चोरगे, साक्षी भोसले या विजेत्यांचा पारितोषिक देऊन गौरव

वैभववाडी (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या त्रिशताब्दी निमित्त वैभववाडी तालुका भाजपाच्या वतीने तालुकास्तरीय खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आज रविवार दि. २६ ऑक्टोबर २०२५ रोजी वैभववाडी एडगाव-वायंबोशी येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर भवन उद्घाटनप्रसंगी उपस्थित महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला. प्रथम क्रमांक पटकाविल्या बद्दल मंदार सदाशिव चोरगे तर द्वितीय क्रमांक पटकाविल्या बद्दल साक्षी प्रविण भोसले यांना मंत्रीमहोदयांच्या हस्ते पारितोषिक देउन गौरविण्यात आले.

यावेळी भाजपा अध्यक्ष सुधीर नकाशे, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, जयेंद्र रावराणे, भालचंद्र साठे, सूनील रावराणे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती शितल पुंड, दिगंबर पाटील, प्रकाश पाटील, प्रकाश अडूळकर, नवलराज काळे, गंगाराम अडुळकर, कोंडीबा अडुळकर, व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!