वेंगुर्लेत भाजपा च्या माध्यमातून ७० वर्षांवरील नागरीकांना “आयुष्यमान वय वंदना” योजनेचे फाॅर्म वाटप

एकाच वेळी ५०० फाॅर्म चे वाटप

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : वेंगुर्ले भाजपा कार्यालयात ७० वर्षांवरील नागरिकांना ” आयुष्यमान वय वंदना ” योजनेचे मोफत फाॅर्म वाटप भाजपा प्रदेश का.का.सदस्य शरदजी चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. यावेळी मंडल अध्यक्ष विष्णु उर्फ पपु परब, जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई व अँड. सुषमा खानोलकर, मच्छिमार सेल जिल्हा संयोजक वसंत तांडेल, जि.का.का.सदस्य सुहास गवंडळकर, साईप्रसाद नाईक, प्रीतेश राऊळ व मनवेल फर्नांडिस, युवा मोर्चाचे प्रणव वायंगणकर, ता.उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे, महीला मोर्चाच्या वृंदा गवंडळकर, वृंदा मोर्डेकर, शितल आंगचेकर, साक्षी पेडणेकर, कृपा मोंडकर, आकांक्षा परब, रसीका मठकर, अल्पसंख्याक सेलच्या हसिनाबेन मकानदार, शक्तिकेंद्र प्रमुख मयूरेश शिरोडकर, हर्षद साळगांवकर, विजय बागकर, महादेव नाईक, आरवली सरपंच समीर कांबळी तसेच बुथ प्रमुख व विविध सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच असंख्य ७० वर्षांवरील स्त्री व पुरुष उपस्थित होते.

error: Content is protected !!