समाजभूषण पुरस्कारप्राप्त सामाजिक कार्यकर्ते संदीप चौकेकर यांचा वाढदिवस सेवाभावी उपक्रमांनी होणार साजरा

कणकवली (प्रतिनिधी) : समाजभूषण पुरस्कारप्राप्त ‘प्राणजीवन सहयोग संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते संदीप रघुनाथ चौकेकर यांचा वाढदिवस यंदा विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने बुधवार, २९ ऑक्टोबर रोजी संपूर्ण जिल्ह्याभरात विविध सेवा आणि सामाजिक बांधिलकीचे उपक्रम राबवले जाणार आहेत.

२९ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता ग्रामपंचायत हळवल येथे प्रशांत गावडे, सिद्धेश परब व एस.एस.पी.एम. लाइफटाईम हॉस्पिटल, पडवे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले असून यामध्ये हृदयरोग, नेत्र, रक्ततपासणी, जनरल सर्जरी, अस्थीरोग, दंतरोग, कान-नाक-घसा, स्त्रीरोग आदी विभागातील तज्ञ डॉक्टरांमार्फत उपचार, औषधे आणि तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत. याशिवाय दिवसभरात विविध सामाजिक उपक्रम राबवले जाणार आहेत.

यामध्ये उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे सकाळी १० वा. रुग्णांना मोफत फळवाटप, करंजे गोवर्धन गोशाळा येथे सकाळी ११ वा. गोचारा प्रदान, सविता वृद्धाश्रम पणदूर येथे दुपारी १२ वा. स्नेहभोजन व भेटवस्तू वाटप, दयासागर छात्रालय, रोणापाल येथे सायं. ५ वा. जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, तसेच कळसुलकर हायस्कूल हॉल, सावंतवाडी येथे सायं. ६.३० वा. संदीप चौकेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित बुद्धिबळ स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न होणार आहे.

कोरोना कालावधीत तसेच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करत सामाजिक बांधिलकी जपत समाजातील विविध स्तरांपर्यंत मदतीचा हात पोहोचवण्याचे कार्य संदीप चौकेकर सातत्याने करत आहेत. आपल्या वाढदिवसानिमित्त हाच सामाजिक सलोखा अजून वृद्धिंगत करण्याचे काम संदीप चौकेकर करत आहेत.

error: Content is protected !!