डॉ. रेड्डी खूनातील तीन आरोपींना घेऊन पोलीस कणकवलीकडे रवाना

बडे खिलाडी अडकणार ; आरोपींची संख्या वाढणार

सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : साळीस्ते येथे मृतदेह सापडलेल्या डॉ. श्रीनिवास रेड्डी यांच्या खूनाच्या गुन्ह्यात 3 संशयित आरोपींना सिंधुदुर्ग पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. एलसीबी आणि कणकवली पोलीस ठाण्याच्या पथकाने बेंगळुर येथे ही कारवाई केली असून कणकवली पोलिसांचे पथक तिन्ही आरोपींसह कणकवलीच्या दिशेने निघाले आहे. मध्यरात्री पर्यंत तिन्ही संशयित आरोपींसह कणकवली पोलिसांचे पथक कणकवलीत पोचण्याची शक्यता आहे. तर एलसीबी चे पथक अद्याप बेंगळुर येथे असून या गुन्ह्यात आणखी आरोपींची संख्या वाढणार असल्याचे समजते. बेंगळुर मधील बडे मासे या खुनात अडकणार असल्याची चिन्हे आहेत.

error: Content is protected !!