BIG BREAKING! महाराष्ट्र सरकार आणि अबू धाबी पोर्ट्स यांच्यात ऐतिहासिक करार

जगभरात नामांकित असणाऱ्या अबू धाबी पोर्ट्सकडून करारबद्ध होणार महाराष्ट्र ठरलं पहिलच राज्य

मुंबई (प्रतिनिधी) : देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच महाराष्ट्र सरकार आणि अबू धाबी पोर्ट्स ग्रुप यांच्यात ऐतिहासिक सामंजस्य करार (MoU) झाला असून
जगभरात नामांकित असणाऱ्या अबू धाबी पोर्ट्सकडून करारबद्ध होणारे भारताच्या इतिहासातील महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मत्स्योद्योग व बंदरे विकासमंत्री नितेश राणे आणि अबुधाबी पोर्ट्स च्या पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत आज हा करार झाला. मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र सागरी विकासाला मोठी चालना मिळाली आहे.

यामुळे महाराष्ट्रासाठी समुद्री क्षेत्रात आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीचे दार उघडले असून तब्बल 2 अब्ज अमेरिकन डॉलर्स (सुमारे ₹16,500 कोटी) इतकी गुंतवणूक यातून होणार आहे. जहाजबांधणी, शिप-ब्रेकिंग, वॉटर ट्रान्सपोर्ट, पोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर आणि स्पोर्ट्स मॅनेजमेंट अशा विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक होणार आहे. याचा फायदा महाराष्ट्रात रोजगार निर्मितीसह सागरी विकासाला होणार आहे.

error: Content is protected !!