आचरा (प्रतिनिधी) : जागृत उन्नती मंडळ त्रिंबक मुंबई व संतोष त्रिंबककर यांच्या प्रायोजकत्वातून त्रिंबक सापळा येथे उभारण्यात आलेल्या ‘आय लव त्रिंबक’ या डिजिटल नामफलकाचे लोकार्पण गुरुवार, १४ मे रोजी आचरा पोलिस उपनिरीक्षक प्रदीप पोवार यांच्या हस्ते सरपंच किशोर त्रिंबककर यांच्या प्रमुख उपस्थिती करण्यात आले. यावेळी जागृत उन्नती मंडळ, त्रिंबक, मुंबई व ग्रामीण शाखेचे बहुसंख्य सभासद, ग्रामपंचायत सदस्य, पोलिस पाटील, त्रिंबक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे त्रिंबक गावाच्या सौंदर्यात भर पडली असून ग्रामस्थांकडून या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे.
त्रिंबक डिजिटल नामफलकाचे आचरा पोलिस उपनिरीक्षक प्रदीप पोवार यांच्या हस्ते लोकार्पण….!











