*चिंचवली येथे झालेल्या चक्रीवादळामुळे ५०० पक्षी मृत*

*पोल्ट्री व्यवसायक धारक मंदार पेडणेकर यांचे सुमारे साडेचार लाख रुपयांचे नुकसान*

*खारेपाटण (प्रतिनिधी) :* कणकवली तालुक्यातील चिंचवली या कृषी संपन्न असलेल्या गावात नुकत्याच झालेल्या अवकाळी पाऊस त्याबरोबर झालेल्या सुसाट चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसला असून या गावात सलग ५ दिवस वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे या गावातील युवा पोल्ट्री व्यवसायिक श्री मंदार अरविंद पेडणेकर यांच्या फॉर्म मधील सुमारे ५०० कोंबडी (पक्षी) मृत झाले असून यामुळे त्यांचे सुमारे साडेचार लाख रुपये एवढे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना समजताच खारेपाटण जिल्हा परिषद सदस्य प्राची ईसवलकर, पंचायत समिती सदस्य गुरुप्रसाद शिंदे, खारेपाटण सरपंच महेंद्र गुरव, भाजप पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व माजी सरपंच रामकांत राऊत, संतोष पाटणकर, ग्रा. पं. सदस्य सुधाकर ढेकणे यांनी तातडीने चिंचवली येथील युवा व्यावसायिक मंदार अरविंद पेडणेकर यांच्या “दिनलक्ष्मी अरोमा फॉर्म ” ला भेट देऊन येथील मृत झालेल्या ५०० कोंबडी (पक्षी ) यांची प्रत्यक्ष पाहणी केली. व मंदार पेडणेकर धीर देत प्रशासनाकडून नुकसान भरपाई मदत मिळवून देण्याबाबत आश्वासन दिले. दरम्यान गेल्या आठवड्यात शनिवारी ९ मे २०२६ रोजी खारेपाटण सह चिंचवली या गावात अवकाळी पाऊस व मोठ्या प्रमाणात झालेल्या चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी झाडे पडून घराची कौले व पत्रे उडून गेले होते. तर अनेक ठिकाणी विद्युत पोल मोडून पडले होते. त्यामुळे या गावातील वीज पुरवठा सलग ६ दिवस बंद झाल्याने पाणी व वीज नसल्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. याचा सर्वाधिक फटका येथील युवा पोल्ट्री व्यवसायिक श्री मंदार पेडणेकर यांच्या “दिनलक्ष्मी अरोमा फॉर्म ” बसला असून येथील सर्व पक्षांना व इलेक्ट्रिक द्वारे पाणी ठिबक द्वारे ऑटोमॅटिक दिले जाते. तर पक्षी सुरक्षित रहाण्यासाठी वातावरण कुलिंग केले जाते. मात्र येथील सर्व पक्षी गेली पाच दिवस पाणी व वीज नसल्यामुळे गर्मी व उकाड्याने हैराण होऊन सुमारे ५०० पक्षी मृत्यूमुखी पडले. त्यामुळे पेडणेकर याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शासनाच्या कृषी व पशू संवर्धन खात्याने त्यांना तातडीची मदत मिळवून देणे गरजेचे आहे. नैसर्गिक आपत्कालीन परिस्थितीचा फटका अशाप्रकारे युवा व्यावसायिकांना बसल्यास व त्यांना शासनाकडून पुन्हा उभारी घेण्यासाठी मदत न मिळण्यास भविष्यात नवे उद्योजक उभे राहणे मुश्किल होईल.

फोटो – चिंचावलीत चक्रीवादळामुळे मंदार पेडणेकर यांचे पोल्ट्रीतील ५०० पक्षी मृत झाले. त्याची पाहणी करताना जि. प. सदस्य प्राची ईसवलकर, पं. स. सदस्य गुरुप्रसाद शिंदे, रामकांत राऊत, सरपंच अशोक पाटीलछाया – संतोष पाटणकर

error: Content is protected !!