सरपंच सुप्रिया कदम यांच्या पुढाकारातून तलाव होणार गाळमुक्त
कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई गोवा महामार्गावरील ओसरगावमधील पर्यटन स्थळ असलेल्या ओसरगाव तलाव आता मोकळा श्वास घेणार आहे. सरपंच सुप्रिया कदम यांच्या पुढाकारातून ओसरगाव तलाव आता गाळमुक्त होणार आहे. गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या योजनेतून यासंदर्भात चा कार्यरंभ आदेश पाटबंधारे विभाग आंबडपाल यांच्याकाढून निर्गमित करण्यात आला आहे. ओसरगाव तलावात साचलेल्या गाळामुळे तलावातील पाणीसाठ्यावर परिणाम होत होता. त्यामुळे गावाच्या परिसरातील जलपातळी घटत होती. ओसरगाव सरपंच सुप्रिया कदम यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून ओसरगाव तलावातील गाळ उपसा करण्यासाठी पाठपुरावा केला होता. अखेर सरपंच सुप्रिया कदम यांच्या पाठपुराव्यास यश आले असून यासंदर्भात कार्यारंभ आदेश निघाल्यामुळे येत्या पावसाळ्यापूर्वी ओसरगाव तलावातील गाळ उपसा करण्यात येणार आहे. त्यामुळे तलावाची खोली वाढून अधिक पाणीसंचय होईल.ज्याचा फायदा ओसरगाव मधील जलपातळी वाढण्यास होईल.












