उबाठा जिल्हा कार्यकारणी सदस्य संदीप सरवणकर यांचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सत्तेतून भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारातून पुन्हा सत्ता म्हणजे दुःशासन मार्गाने मिळवलेल्या दुर्योधनाचे अमाप वापराने पुन्हा दुःशासनच पहायला मिळते. येथे प्रशासन ते मतदार सर्वांना विकत घेता येते असा आत्मविश्वास असलेले जिल्ह्यातील भाजपा नेते आता त्यामुळे सत्तापिपासू झाले आहेत. यामुळे सत्तापिपासू यांना जनसामान्यांच्या गरजा पेक्षा आता, स्वतःच्या मौजा भागवण्यात जास्त रस झालेला आहे. कारण त्यांनी येथील जनतेला गृहीत धरलेले आहे आणि सत्तेच्या चाव्या आपल्याच हातात असायला हव्यात, मग त्यासाठी त्याचं पक्ष फोडी ते मतदार विकत घेण्याचे कुटीर उद्योग कायम चालू असतात. खरतर, सिंधुदुर्गातील नळपाणी योजना, आरोग्य व्यवस्था, सरकारी शिक्षण संस्था, वाहतुकीचे रस्ते यांचा बट्ट्याबोळ झालेला असताना, येथील तरुणांच्या हाताला निर्माण करण्याचे कसलेही नियोजन येथे दिसत नाही. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सत्ता अनेक वर्षे हातात असताना भाजपा पक्ष कोकणात काय ही करू शकले नाही. मतदार चोरी, बोगस मतदान नोंदणी या मध्येही सिंधुदुर्ग मागे नाही. अनेक मतदार हे मुंबई, ठाणे, पालघर येथील मतदार असताना, त्यांची नावे येथे सिंधुदुर्गात परत नोंदवण्यात आलेले आहेत. त्यात प्रशासनाचा हात नाही असे म्हणणे, म्हणजे ती एक अंधश्रद्धा म्हणावी लागेल. यातून मात्र, फार कष्टाने आपल्या स्वातंत्र्य सेनानी याने मिळवलेली लोकसत्ता ही, आता या ठराविक सत्तापिपासूच्या पायाची दासी बनत चाललेली दिसत आहे. तिला पुन्हा दासी बनवण्यासाठी त्यांचे स्थानिक प्रतिनिधी मनोदय करून आहेत. त्यांचे मनसुबे हे उधळून लावण्यासाठी शिवसैनिकांनी आता मावळे बनून छातीचा कोट करून लोकशाहीचे रक्षण केले पाहिजे. गावागावात भ्रष्ट मार्गाचा अंमल करणारे लोकांचा जनतेसमोर पर्दाफाश केला पाहिजे आणि जिल्हा तसेच तालुका प्रशासनात स्वच्छ कार्य करण्यासाठी उद्धव व बाळासाहेबांच्या विचार घेऊन एकटवून आलेल्या समविचारी पक्षाचे प्रतिनिधी हे पंचायत समिती व जिल्हा परिषद मध्ये निवडून दिले पाहिजे. थोडक्यात जिल्ह्यातील “सत्तापिपासू पासून लोकशाही जोपासू” हा संदेश घरा घरात पोचविणे हे आपले आद्य कर्तव्य आहे, हे सैनिकांनी लक्षात ठेवले पाहिजे.












