न्यायालयीन कोठडी रद्द करत सुनावली पोलीस कोठडी
सरकारी वकील गजानन तोडकरी यांचा यशस्वी युक्तिवाद
सावंतवाडी (प्रतिनिधी) : दिनांक 14 ऑक्टोबर, 2025 रोजी बाहेरचावाडा सावंतवाडी येथील सर्फराज भाऊद्दिन ख्वाजा याला सावंतवाडी पोलिसांनी 82 किलो गोमांस व इतर साहित्य बाळगल्या प्रकरणी अटक करून 15 ऑक्टोबर, 2025 रोजी सावंतवाडी न्यायालयासमोर हजर करून आरोपीची तीन दिवस पोलीस कोठडी मागितली होती. परंतु सावंतवाडी न्यायालयाने पोलीस कोठडी नाकारून आरोपीस न्यायालयीन कोठडीत घेऊन त्वरित जामिनावर मुक्त केले होते. त्या निर्णयाविरुद्ध सावंतवाडी पोलिसांनी अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांच्या वतीने जिल्हा सत्र न्यायालयात रिविजन दाखल केले होते. त्या रिविजनची सुनावणी होऊन आज अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती देशमुख यांनी सावंतवाडी न्यायालयाचा आदेश रद्द करून आरोपी सर्फराज भाऊद्दीन ख्वाजा याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.












